Apang Mi? Chee, Abhang Mi | अपंग मी? छे, अभंग मी
अपंग मी? छे, अभंग मी!
प्रकाश बोकिल
वीस वर्षापूर्वी इ.स. 2004 मध्ये इजिप्तमधील कैरो या शहरात ऑलिंपिक स्पर्धा झाल्या होत्या. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात आपल्या हातात ऑलिंपिकची ज्योत घेऊन मैदानावर दौड करण्याचा अत्यंत दुर्मीळ असा बहुमान आफ्रिकेच्या घाना या देशातील एका युवकाला मिळाला होता. त्याचे नाव इमॅन्युएळ. हा इमॅन्युएळ अपंग होता. जन्मत:च त्याच उजवा पाय अर्धाच होता; अपंग, पंगू होता तो.
एका पायाने अपंग असलेल्या या इमॅन्युएलनं सायकलवरून त्याचा स्वदेश – ‘घाना’ पिंजून काढला. त्याचा टी-शर्टही घानाच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचा होता; त्यावर मधोमध लिहिलेलं होतं ‘पोझो’. ‘पोझो’चा अर्थ ‘होय, मी दिव्यांग आहे.’ हा शब्द त्याने निःसंकोचपणे मिरवला, लोकांना दाखवला, त्यांच्यापर्यंत पोचवला.
Author Anand Chabukswar
Publisher Jyotsna Prakashan