Raja Harishchandra | राजा हरिश्चंद्र
सत्य, धर्म आणि त्यागासाठी सर्वस्व त्यागणाऱ्या सत्यवादी राजा हरिश्चंद्र यांच्या चरित्रावर आधारित मीनाक्षी डफळ-पाटोळे लिखित पहिली मराठी कादंबरी. पौराणिक कथेचा प्रभावी, भावपूर्ण आणि विचारप्रवर्तक प्रवास. Buy Online / खरेदी करा Kalasahitya वर Free Delivery सह.
भारतीय इतिहासात सत्य, प्रामाणिकता आणि दानशीलता यांची अढळ प्रतिमा म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते, त्या सत्यवादी राजा हरिश्चंद्र यांची ही प्रभावी मराठी कादंबरी.सत्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या महानायिकेत आपल्या संस्कृतीतील आदर्श जीवनमूल्यांचे जाज्वल्य दर्शन होते. ऋषी विश्वामित्र यांच्यासोबतचा निगर्वी संवाद, कर्तव्यनिष्ठा, कठोर परिक्षा, पत्नी तारामतीचा संघर्ष, पुत्र रोहिताची वेदना… या कथेतील प्रत्येक दृश्य वाचकांना भावविश्वात खोल नेतं.
या पुस्तकाची वैशिष्ट्ये म्हणजे—
-
पौराणिक कथेतील अनाठायी फॅन्टसी टाळून केलेली वास्तववादी मांडणी
-
ऋषी विश्वामित्र, तारामती आणि हरिश्चंद्र यांच्या स्वगतांतून उलगडलेले सूक्ष्म भाव
-
सत्य, त्याग, कर्तव्य, धर्म आणि मानवी मूल्यांचा प्रभावी उहापोह
-
भारतीय संस्कृतीतील अजरामर नायकाचे साहित्यिक, विचारप्रधान दर्शन
चित्रपट, नाटक, पोवाडे आणि लोककथांतून अमर झालेल्या या व्यक्तिरेखेची पहिली मराठी कादंबरी, जी लेखकाच्या उत्कृष्ट शैलीत नव्याने जीवंत होते.
राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्काराने सन्मानित ही कादंबरी प्रत्येक वाचकाच्या ग्रंथसंग्रहात असायलाच हवी.
Author Minakshi Dafal Patole
Publisher Madhushree Publication