Urmila | उर्मिला
मिथिलेची राजकन्या उर्मिला — जनकनंदिनी, सीतेची सावली, पण स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व असलेली एक स्त्री.
लक्ष्मणासोबत विवाह झाल्यानंतर तिने आयोध्येच्या राजप्रासादात पाऊल टाकलं. प्रपंचाची सुरुवात झाली. पण अचानक — लक्ष्मणाचा चौदा वर्षांचा वनवास.
सर्व जण सीतेच्या विरहाची कथा जाणतात…
पण उर्मिलेला सोबत कोण होतं? चौदा वर्षे ती एकटी —
पती जिवंत, पण तिच्यापासून दूर.
स्वतःची तगमग, प्रतीक्षा, एकांत आणि स्त्री म्हणून असलेली ओळख टिकवण्याचा संघर्ष. वनवासानंतर प्रपंचाची नवी सुरुवात.
आई होणे — चंद्रकांत आणि अंगदीया यांच्या जन्माची कथा.
आयुष्याचा उतारवय — शांत, संयत, पण अनुभवानं परिपूर्ण. ही कादंबरी उघड करते —
उर्मिलाचं मौन, तिचं सामर्थ्य, तिचं प्रेम, तिचं धैर्य आणि तिच्या अंतर्मनात दडलेल्या प्रश्नांची उत्तरं.
ही फक्त पौराणिक कथा नाही —
ही एका स्त्रीच्या अस्तित्वाच्या शोधाची आणि जगण्याच्या अर्थाची कादंबरी आहे.
Author Samar
Publisher Samar Publication