Vendetta | व्हेन्डेटा | Marie Corelli | Novel | Free Shipping in Maharashtra
व्हेन्डेटा – Marie Corelli (मेरी कोरेली)
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील इटलीमधील नेपल्स शहराच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही प्रेम, विश्वासघात आणि सूडाची उत्कंठावर्धक कहाणी आहे.
उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेला कौंट फॅबिओ रोमानी हा सज्जन, सभ्य आणि उच्च विचारांचा माणूस असतो. त्याचा जिवलग मित्र गिडो फेरारी हा पेशाने चित्रकार असून स्वभावाने रंगेल असतो. रोमानीचे आयुष्य पत्नी नीना आणि लहान मुलीसोबत आनंदात सुरू असते. मात्र, नेपल्समध्ये कॉलराची साथ पसरल्यानंतर त्याच्या आयुष्यात अनपेक्षित घटना घडते.
एका आजारी व्यक्तीला मदत करताना रोमानी बेशुद्ध पडतो. त्याला मृत समजून शवपेटीत ठेवून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, काही काळानंतर शुद्धीवर आलेला रोमानी मोठ्या प्रयत्नांनी शवपेटीतून बाहेर पडतो. शवागारातून सुटण्याचा प्रयत्न करताना त्याला एका दरोडेखोराने लपवलेला खजिना सापडतो.
पत्नीला आपल्या जिवंत असण्याची आनंदाची बातमी देण्यासाठी तो घरी परततो. मात्र, तिथे त्याला पत्नी नीना आणि जिवलग मित्र गिडो फेरारी यांना एकत्र पाहावे लागते. या विश्वासघातामुळे त्याच्या मनात दुःख, तिरस्कार आणि सूडाची भावना निर्माण होते. येथूनच एका प्रामाणिक पतीच्या सूडाच्या प्रवासाला सुरुवात होते.
Vendetta by Marie Corelli is an engaging translated novel set in Naples, Italy. The story explores love, betrayal, friendship, greed, revenge and human relationships through the dramatic life of Count Fabio Romani. A compelling read for readers who enjoy classic fiction, suspenseful storytelling and revenge novels.
Author Marie Corelli
Publisher MEHTA PUBLISHING HOUSE