Mahamaya Nilavanti | महामाया निळावंती
चारशे वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वास्तव्यास असलेली निळावंती — एक वनदेवता, एक रहस्य, एक भय!
स्वार्थी बाजिंद्याने तिच्याशी विवाह करून पशुपक्ष्यांची भाषा आत्मसात केली आणि अखेरीस तिचा खून केला, अशी लोककथा सांगितली जाते. पण निळावंती खरंच मेली होती का?
१९९२ मध्ये घडलेली एक अजब घटना या कथेला वेगळं वळण देते. आपल्या मृत मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी एक बाप निळावंतीची कुप्रसिद्ध पोथी शोधत जंगलात येतो. ही पोथी वाचणाऱ्याला वेड लागतं किंवा मृत्यू ओढवतो, अशी दंतकथा आहे. पण त्या पोथीमागचं सत्य काय?
निळावंती आजही अस्तित्वात आहे का?
तिची भाषा कोणती आहे?
खून होऊनही ती जिवंत कशी राहिली?
बाजिंद्याने खरंच तिचा खून केला होता का?
अठरा पौराणिक पोथ्या, ऐतिहासिक दस्तऐवज, तांत्रिक आख्यायिका आणि लोककथांच्या सखोल अभ्यासातून लेखक सुमेध यांनी उभी केलेली ही अद्भुत, थरारक, जादुई आणि मेंदूशी खेळणारी मेटाफिक्शन कादंबरी वाचकाला अखेरपर्यंत खिळवून ठेवते.
Author Sumedh
Publisher New Era Publishing House