Menduchi Mashagat | मेंदूची मशागत
मेंदूची मशागत’ हे देवा झिंजाड लिखित पुस्तक म्हणजे अनुभव, विचार आणि वास्तव यांची प्रभावी सांगड आहे. शहरात वास्तव्यास असूनही लेखकाचं लेखन गावाशी घट्ट जोडलेलं आहे. ग्रामीण जीवन, संघर्ष, माणसांची मानसिक घुसमट आणि आजच्या काळातील ज्वलंत सामाजिक विषय या पुस्तकात अत्यंत प्रामाणिकपणे मांडले आहेत.
या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे — वाचनसंस्कृती आणि विचारक्षम मेंदू. लेखक ठामपणे मांडतात की, मेंदूचा खरा विकास मोबाइलच्या स्क्रीनवर नव्हे, तर वाचन, चिंतन आणि अनुभवांमधून होतो. आजचा मेंदू मोबाईलमध्ये अडकलेला असून, तो पुन्हा “डोक्यात आणण्यासाठी” अशी मेंदूची मशागत आवश्यक आहे, असे मत समीक्षक शरद तांदळे यांनी व्यक्त केले आहे.
लहान-लहान प्रकरणांतून मांडलेले अनुभव, संघर्षातून आलेले निष्कर्ष आणि थेट मनाला भिडणारे विचार हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. कुठलाही बोजड उपदेश न करता, अनुभवांच्या माध्यमातून जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी हे पुस्तक देते.
‘मेंदूची मशागत’ हे केवळ वाचनासाठीच नाही, तर स्वतःकडे आरशात पाहायला लावणारं, विचार करायला भाग पाडणारं आणि मानसिक जागृती घडवणारं पुस्तक आहे. तरुण पिढी, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संवेदनशील वाचकांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
Author Deva Zinjad
Publisher New Era Publication House