Skip to product information
Mudak Kumpan | मुडकं कुंपण

Mudak Kumpan | मुडकं कुंपण

Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 160.00
समाजजीवनाला एक दिशा असावी म्हणून नीति-अनीतीचे, नैतिकतेचे काही नियम घालून दिले जातात. पण ‘काहींना’ मात्र त्यातून सूट मिळते, आणि या दांभिकतेच्या वरवंट्याखाली भरडली जाते ती वंचित, अल्पशिक्षित स्त्री !

अशाच एका भरडलेल्या स्त्रीची, रंभीची ही कहाणी…. तिच्या अर्धवट संसाराची… तिच्या व्यथा-वेदनांची…

तिच्या न संपणाऱ्या भोगांची… तिच्या मनातल्या उलाघालीची…. तिच्या संघर्षाची… तिच्या आशावादाची….

समाजातील दांभिकतेवर भाष्य करणाऱ्या… हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना-प्रसंगांमधून गावजीवनाचं, त्यातल्या स्त्री-जीवनाचं अस्सल चित्रण करणारी कादंबरी…. मुड़क कुपण

Author Ravindra Pandhare

Publisher Rohan Prakashan

You may also like