Stones into Schools | स्टोन्स इंटू स्कूल्स | Greg Mortenson | Inspirational Non-Fiction | Free Shipping in Maharashtra
Stones into Schools हे पुस्तक पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील दुर्गम व उपेक्षित भागांत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी सुरू असलेल्या एका प्रेरणादायी कार्याचा वेध घेते.
ग्रेग मॉर्टेन्सन यांची ‘Central Asia Institute’ ही सेवाभावी संस्था गेली सोळा वर्षे या देशांमधील दुर्गम भागांत शाळा बांधून मुलांच्या, विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.
दहशतवाद्यांची बंडखोरी, अस्थिरता आणि हिंसाचाराने ग्रासलेल्या या भागांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि विकास घडवून आणण्यासाठी शिक्षण हीच गुरुकिल्ली आहे, असा या संस्थेचा ठाम विश्वास आहे.
अमेरिकन देणगीदारांनी सढळ हाताने दिलेल्या देणग्यांचा या सत्कार्यासाठी विनियोग करताना संस्थेने विविध प्रकल्पांच्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक लोकांशी विश्वास आणि आदरावर आधारित जिव्हाळ्याचे नातेही जोडले आहे.
उमद्या वृत्तीने, चिकाटीने आणि विनयशीलतेने केलेल्या या कार्याचा मनमोहक आलेख म्हणजे हे पुस्तक. प्रचंड अस्थिरता आणि हिंसाचाराने ग्रासलेल्या देशांमध्ये जिवावर उदार होऊन शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या निःस्वार्थी लोकांची ही हृद्य, प्रेरणादायी आणि थरारक कहाणी मानवी मनाच्या थोरवीचे विविध पैलू उलगडते.
Author Greg Mortenson
Publisher MEHTA PUBLISHING HOUSE