Sarkari Davakhana | सरकारी दवाखाना
सरकारी दवाखाना म्हणजे केवळ उपचाराचं ठिकाण नाही—तो आहे वेदना, आशा, मृत्यू आणि माणुसकी यांचा संघर्ष!
जेव्हा खासगी उपचार परवडेनासे होतात, पैसा संपतो, सोनं गहाण जातं, जमीन विकावी लागते, तेव्हा माणूस सरकारी दवाखान्याच्या पायरीवर येतो… आणि सुरू होतो मृत्यूशी दोन हात करणारा प्रवास.
अपघात विभागातील धावपळ, आयसीयूमधील अखेरचे श्वास, शेवटच्या क्षणी नातेवाईकांची घालमेल, पोस्टमार्टम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेगळंच जग, डॉक्टरांचं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य, डिलिव्हरी वॉर्डमधील जीवन-मृत्यूची सीमारेषा—हे सगळं या कादंबरीत जिवंत होतं.
लावारिस रुग्ण, दवाखान्याचा दर्प, कचराकुंडीत सापडलेलं नाळेसकट बाळ, छातीवर ‘मृत्यू’ नावाचा टॅटू काढणारा कर्मचारी, म्हाताऱ्यांची प्रेमकहाणी, स्वतःच्या हाताने मुलाचं व्हेंटिलेटर बंद करणारा बाप—या प्रत्येक कथेतून मानवी मनाचा थरार उलगडत जातो.
याच सगळ्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर उलगडतो एक वेगवान सस्पेन्स थ्रिलर, दवाखान्याच्या चार भिंतीआड घडणारं एक अदृश्य युद्ध, आणि एक मोठा गुन्हा—ज्याची उकल शेवटच्या पानापर्यंत थांबवत नाही.
‘प्रतिपश्चंद्र’ आणि ‘केदारनाथ १७ जून’ या गाजलेल्या कादंबऱ्यांनंतर, ४२,०००+ प्रतींच्या यशानंतर, डॉ. प्रकाश कोयाडे यांची ही तिसरी कादंबरी वाचकाला हसवते, रडवते, विचार करायला लावते—आणि आपल्या एखाद्या माणसाची आठवण नक्की करून देते.
(एक विनंती: चुकूनही शेवटचं पान आधी वाचू नका!)
Author Prakash Suryakant Koyade
Publisher Ellora Publication